Chakan : दुचाकी चोराला चाकण पोलिसांकडून अटक

Two-wheeler thief arrested by Chakan police

एमपीसी न्यूज – कंपनीसामोर उभी केलेली दुचाकी चोरून नेणाऱ्या एका चोरट्याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

प्रदीप शिवसांब उमाटे (वय 19, रा. निघोजे, ता. खेड) असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी कैलास राजाभाऊ मस्के (वय 26, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कैलास यांना त्यांचे घरमालक यांनी दुचाकी (एमएच 14 / सीक्यू 4459) वापरण्यासाठी दिली आहे. सोमवारी सकाळी फिर्यादी कैलास दुचाकीवरून कंपनीत कामासाठी गेले.

त्यांनी चाकण येथील इस्टीम इंजीनियरिंग कंपनीच्या गेटसामोर दुचाकी पार्क केली. आरोपी प्रदीप याने त्यांची दुचाकी चोरून नेली.

चाकण पोलिसांनी प्रदीप याला दुचाकीसह पळून जाताना पकडले. म्हाळुंगे चौकीत आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ही दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी कैलास यांना बोलावून दुचाकीची ओळख पटवली आणि गुन्हा दाखल केला.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.