Chakan : नगरपरिषदेच्या अधिकार्‍यास धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चाकण शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनजागृतीचे काम करणाऱ्या चाकण नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यास धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 21) सकाळी साडे आठच्या सुमारास चाकण मार्केट यार्ड येथे घडली.

विजय शंकर भोसले (वय 42, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोसले हे चाकण नगरपरिषदेमध्ये सुपरवायझर म्हणून काम करतात. ते शनिवारी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृतीचे काम करीत होते. त्यावेळेस चाकण मार्केट यार्ड येथे एक व्यक्ती प्लास्टिक कॅरीबॅग मध्ये लसूण विक्री करत असताना आढळून आला.

त्यामुळे भोसले यांनी त्याच्याकडून प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केल्या. यावरून अज्ञात इसमाने भोसले यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.