Champion Sports Store : डेक्कन जिमखाना येथील चॅम्पियन स्पोर्ट्स स्टोअरला आग

एमपीसी न्यूज : डेक्कन जिमखाना येथील चॅम्पियन स्पोर्ट्स स्टोअरला आज (सोमवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये कोणी जखमी नाही व कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

 

आगीचे स्वरूप मोठे असल्याने घटनास्थळी पाच गाड्या दाखल झाल्या आहेत. यावेळी आग कशामुळे लागली हे कारण अद्याप कळू शकलेले नाही. अग्निशामक दलाकडून एरंडवणा अग्निशमन केंद्र येथील वाहन रवाना करण्यात आले होते. घटनास्थळी पोहोचताच अग्निशमन अधिकारी राजेश जगताप यांनी व जवानांनी पुढील कार्यवाही केली.

Pune : अनोळखी पुरुषाचा सडलेला मृतदेह सापडला नागझरी ओढ्यात

या ठिकाणी तळमजला व तीन मजली इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग लागली होती. दलाची मदत पोहचताच आगीचे, धुराचे स्वरूप पाहाता अतिरिक्त मदत मागवण्यात आली. एरऺडवणा अग्निशमन केऺद्राकडील जवानांनी एक्झॉस्ट ब्लोअरचा वापर करून तसेच एका ठिकाणच्या काचा फोडून धूर बाहेर काढत बीए सेटचा वापर केला. बेसमेंटमध्ये प्रवेश करुन आगीवर पाण्याचा मारा सुरु केला व बेसमेंटमधे व्हेन्टीलेशन नसल्याने आग विझविण्यात अडचणी येत होत्या. तरी एरऺडवणा, कसबा, कोथरूड या फायर गाड्या आणि मध्यवर्ती अग्निशमन केऺद्राकडील टँकरच्या सहाय्याने व तीन अधिकारी व पऺधरा जवानांच्या अथक सहाय्याने आगीवर पाऊण तासात कऺट्रोल करून, पुढील दहा मिनिटांत आग पूर्णपणे विझवली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या वेळी वरिष्ठ अग्निशमन अधिकारी रमेश गांगड व गजानन पाथ्रुडकर यांनी सहकार्य केले.

https://www.youtube.com/watch?v=6XHD9oSl9YU

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.