Pune Crime : पुण्यात सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या, दुचाकीला धडक देऊन धारदार शस्त्राचे वार

एमपीसी न्यूज : पुणे (Pune Crime) जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार ऋषिकेश तांबे (वय 30) याची आज पहाटेच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली. खडकवासला धरणाच्या संरक्षण भिंतीला लागून असलेल्या मुख्य सिंहगड रस्त्यावर हा सर्व प्रकार घडला. अज्ञात हल्लेखोराने आधी त्याच्या दुचाकीला धडक दिली. आणि त्यानंतर धारदार शस्त्राचे वार करून त्याचा खून केला.
ऋषिकेश तांबे हा सराईत गुन्हेगार आहे. हवेली पोलीस ठाण्यात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी डोंजे परिसरात एका तरुणावर जीवघेणा हल्ला करून तो फरार झाला होता. दरम्यान, आज पहाटेच्या सुमारास तो डोनजेच्या बाजूने पुण्याकडे दुचाकीने जात असताना अज्ञात हल्लेखोराने धडक देऊन त्याची दुचाकी पाडले. त्यानंतर धारदार शस्त्राचे वार करून मारेकरी पसार झाले.
हल्लेखोरांची ओळख अद्याप पटली (Pune Crime) नाही. प्राथमिक अंदाजानुसार त्याची हत्या करण्यात आली असावी असा संशय व्यक्त केला जातोय. सकाळच्या सुमारास काही नागरिकांना मुख्य रस्त्यावर मृतदेह आढळून आल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली होती. त्यानंतर हवेली पोलिसांनी घटनास्थळी भाव घेतली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.