Pune : अनोळखी पुरुषाचा सडलेला मृतदेह सापडला नागझरी ओढ्यात

एमपीसी न्यूज : एका अनोळखी (Pune) पुरुषाचा सडलेला मृतदेह आंबेगाव खुर्द येथील नागझरी ओढ्यात सापडला. ही माहिती पुणे महानगरपालिकेतील अग्निशमन विभागातील कात्रज स्टेशन अधिकारी संजय रामटेके यांनी दिली आहे.

रामटेके म्हणाले, कि आज सकाळी 9.56 वाजता वर्दी मिळाल्यावर एक अग्निशमन बंब व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. आंबेगाव खुर्द मधील दळवीनगर येथे एंड्युरा फिटनेस क्लब समोर वाहणाऱ्या नागझरी ओढ्यात मृतदेह तरंगत होता. पाऊस नसल्याने ओढ्यात फक्त घोट्या एवढे पाणी वाहत होते.
अग्निशमन कर्मचाऱ्यांनी त्या वाहत्या पाण्यातून मृतदेह (Pune) बाहेर काढला. त्यावेळी चेहरा दिसत नव्हता. बॉडी पूर्ण सडली होती. मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.