OBC Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकामधील ‘ओबीसी’ आरक्षणावरच ठाम

एमपीसी न्यूज : आज दिल्ली येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी ओबीसी आरक्षणशिवाय (OBC Reservation) निवडणूक होऊ नये असे मत मांडले. महाराष्ट्रात 17 जिल्ह्यामध्ये एकूण 92 नगरपरिषमध्ये निवडणूक होणार आहे. परंतु, हि निवडणूक ओबीसी आरक्षण शोवाय होणार आहे. यासाठी भाजपसोबतच महाविकास आघाडीचाही तितकाच विवर्ध आहे. कारण आहे ‘ओबीसी आरक्षण’.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, कि ‘ओबीसी आरक्षणासहितच निवडणूक व्हावी. पावसाळ्यात निवडणुका घेता येणार नाही. कारण सर्वत्र पाणी साचणे, पूर परिस्थिती अशा समस्या येतात. त्यामुळे हि निवडणूक पुढे ढकलण्यात यावी.

Maharashtra Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रद्द होण्याची शक्यता

एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत सॉलिस्टर तुषार मेहता यांची भेट घेतली. यावरून पत्रकारांनी त्यांना आगामी निकालाबाबत भेट घेतली का अशी विचारणा केली. तर, यावर एकनाथ शिंदे यांनी ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भात चर्चा केल्याचे म्हंटले आहे. ओबीसी आरक्षण आणि पडणारा मुसळधार पाऊस हि दोन कारणे पाहता हि निवडणूक (OBC Reservation) रद्द होण्याच्या मार्गावर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.