Shirur : मुख्यमंत्र्यांनी घाईने शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करणे हे शेतकरी आक्रोश मोर्चाचे यश – अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Shirur) यांनी इतक्या घाईने शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करणे, हे शेतकरी आक्रोश मोर्चाचे यश आहे, असे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.

डॉ. कोल्हेंच्या आक्रोश मोर्चाला गर्दी होत नसल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून झाल्यानंतर त्यावर डॉ. कोल्हेंनी खुलासा केला आहे. मुख्यमंत्र्यांनी इतक्या घाईनं शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करणं हेच शेतकरी आक्रोश मोर्चा जिथे पोहोचायचा तिथे पोहोचलाय याचं द्योतक आहे. मुख्यमंत्री इथे येत आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, असेही कोल्हे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविल्याने आमचे निलंबन झाल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे शेतकरी आक्रोश मोर्चा काढला आहे. त्याला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Talegaon Dabhade : पुर्ववैमनस्यातून एकाला लाकडी दांडके व लोखंडी हत्याराने मारहाण

अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवड केली यासाठी मी मुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांचं शिरूर लोकसभा (Shirur) मतदारसंघात नक्कीच स्वागत आहे.

मात्र येताना कांद्यावरची निर्यातबंदी उठली आहे, बिबटप्रवण क्षेत्रात थ्री फेज लाईट दिली आहे व दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पाच रूपये अनुदान आहे, असे निर्णय घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघात या, असेही कोल्हे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिंदे गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात तसा प्राचार सुरू केला आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. कोल्हे यांचा पराभव करणार म्हणजे करणार, असा निर्धार केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.