Chandni Chowk : चांदणी चौकात अडकला मुख्यमंत्र्यांचा ताफा; स्थानिकांची समस्या पाहून अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश

एमपीसी न्यूज : पुण्यामध्ये चांदणी चौकात (Chandni Chowk) नेहमीच ट्रॅफिक असते. त्यामुळे स्थानिकांना आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. शुक्रवारी रात्री या वाहतूक कोंडीचा फटका खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसला. त्यांचा ताफा वाहतूककोंडीमध्ये अडकला. आणि त्याच वेळी स्थानिकांनी देखील या वाहतूक कोंडीची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. स्थानिकांनी शिंदेंकडे तक्रार केल्यानंतर तातडीने त्यांनी या तक्रारीची दखल घेतली.

Traffic rules: चांदणी चौकातील वाहतूक कोंडीवर तोडगा, नवीन वाहतूक नियम जारी

या वाहतूक कोंडीचा प्रश्न विधान सभेत देखील मांडण्यात आला होता. तसेच, यावर उपाय म्हणून शुक्रवारी चांदणी चौकात वाहतुकीचे नियम देखील लागू झाले आहेत. पिंपरी-चिंचवडचे वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांनी वाहतूक नियमनाचे नवीन आदेश निर्गामित (Chandni Chowk) केले असून हे आदेश प्रायोगिक तत्वावर 26 ऑगस्ट पासून लागू होणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी स्थानिकांची तक्रार लक्षात घेता लगेच अधिकाऱ्यांना फोन केला. आणि आज सकाळी साडेआठ वाजता पिंपरी-चिंचवडचे वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांना स्पॉटवर भेट द्या असे आदेश दिले. एक ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे समोर आले आहे. येथील वाहतूक कोंडीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी तातडीने आढावा बैठक घेण्याचे आदेश दिले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे स्वतः अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा सुस येथून चांदणी चौकाकडे जात होता. मात्र चौकातील वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा पाषाण पर्यंत पोहोचल्या होत्या. या वाहतूक उडीत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अडकले होते. या महामार्गाला पर्यायी रस्ता नसल्याने वाहतूक कोंडीतून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याची सुटका कशी करायची या गोंधळात वाहतूक पोलीस अडकून पडले होते.
पुणे मुंबई महामार्गावरील चांदी चौक परिसरात दररोज वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या ठिकाणी उड्डाणपूल आणि महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न भीषण झाला आहे. या संदर्भातच पुणे महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस, आयुक्त पुणे जिल्हाधिकारी, महामार्ग प्राधिकरण आणि राज्याचे मुख्य सचिव यांना मुख्यमंत्र्यांनी फोन करून प्रवाशांच्या अडचणी दूर करण्यास सांगितले. चांदणी चौकात आज प्रशासकीय अधिकारी येऊन पाहणी करणार असल्याचे सूत्राने सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.