MNS : मनसे तर्फे ह. भ. प. संग्रामबापू यांचा सन्मान

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार आपल्या अध्यात्माच्या माध्यमातून ह. भ.प. संग्रामबाप्पू भंडारे यांनी सांगितले. यामुळे त्यांचा सन्मान मनसेचे जिल्हा अध्यक्ष समिर थिगळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत,मनसे कामगर सेना जि. उपाध्यक्ष मनोज खराबी, आळंदी मनसे शहराध्यक्ष निलेश घुंडरे इ. मनसे सैनिक उपस्थित होते.

Home Minister : गणेशोत्सवामधील होम मिनिस्टर विशेष भागाचे चित्रीकरण करण्यासाठी आदेश बांदेकर थेऊरमध्ये!

तसेच यावेळी संग्रामबापू यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मोबाईल द्वारे संभाषण झाले. मोबाइल संभाषणात ह. भ. प. संग्राम बापू यांनी त्यांचा समवेत काही वारकरी मंडळी (MNS) आपणास (राज ठाकरे यांस) भेटण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ह.भ.प.संग्रामबापू थोड्याच दिवसात काही वारकरी मंडळीना घेऊन मुबंईला जाणार आहे. याबाबतची सर्व माहिती रस्ते आस्थापना खेड तालुकाध्यक्ष प्रसाद बोराटे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.