Home Minister : गणेशोत्सवामधील होम मिनिस्टर विशेष भागाचे चित्रीकरण करण्यासाठी आदेश बांदेकर थेऊरमध्ये!

एमपीसी न्यूज : अष्टविनायकातील पंचम स्थानावर विराजमान असणाऱ्या श्रीक्षेत्र थेऊर येथे श्री चिंतामणी गणपती बाप्पांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर उर्फ भाऊजी यांच्या झी मराठी मालिका होम मिनिस्टर (Home Minister) खेळ पैठणीचा या गणेश उत्सवामधील विशेष भागाचे शूटिंग करण्यात आले.

श्री चिंतामणी मंदिरामध्ये आदेश बांदेकर यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. त्यांचा थेऊर ग्रामस्थ वतीने व चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. व त्यांच्यासोबत विविध विषयांवर चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ह. भ. प. आनंद महाराज तांबे यांनी चर्चा केली.

Innerwheel Club : इनरव्हील क्लबतर्फे विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.