Innerwheel Club : इनरव्हील क्लबतर्फे विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा

एमपीसी न्यूज – इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Innerwheel Club) यांच्या वतीने तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नथुभाऊ भेगडे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये प्रोजेक्ट चेअरमन शर्मिला शहा आणि ज्योती देशपांडे यांनी मूर्ती बनविण्यास शिकवली.
इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने आज नगरपालिकेच्या नथुभाऊ भेगडे शाळेतील विद्यार्थ्यांना गणपती मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पल्लवी विजय सरनाईक यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रोजेक्टच्या प्रोजेक्ट चेअरमन शर्मिला शहा तसेच ज्योती देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मूर्ती बनविण्यास शिकवली.

यावेळी सेक्रेटरी निशा पवार, मुग्धा जोर्वेकर, अंजली जव्हेरी, सुचित्रा कडवे, दीपा राऊत, सुनीता अगरवाल, क्लबच्या सदस्य तसेच नगरपरिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक दोनच्या मुख्याध्यापक वर्षा थोरात, शिक्षक सुधीर बसवंते, शिक्षिका शितल रासकर, लिपिक सुप्रिया वाव्हाळ, शंकर तोळे, आशा गायकवाड, योगिता जाधव, मयुरेश मुळे, बाळू जडर,रविंद्र बच्चे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजनात सहकार्य देखील सर्व (Innerwheel Club) शिक्षकांनी केले. प्रास्ताविक अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी  केले, तसेच शाळेच्या वतीने आभार मुख्याध्यापिका थोरात यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.