Chikhali : चिखली येथे पकडले 116 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज ,अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चिखली (Chikhali)येथे कारवाई करत 116 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज पकडले. मुंबई येथील एका व्यक्तीकडून ड्रग्ज खरेदी करून ते पिंपरी चिंचवड शहरात विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 10) सायंकाळी पावणे सहा वाजता करण्यात आली.

रामकुमार रामसजीवन मिश्रा (वय 45, रा. नालासोपारा, पालघर. मूळ रा. उत्तर प्रदेश), अब्दुल मुशरफअली कलीम उर्फ सिद्दिकी (वय 35, रा. कुदळवाडी, चिखली. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या पुणे पिंपरी चिंचवडच्या 22 विकासकांना नोटिसा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधववाडी-कुदळवाडी रोडवर वडाचामळा(Chikhali) येथे दोघेजण संशयितपणे थांबले असून त्यांच्याकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन रामकुमार आणि अब्दुल या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता मेफेड्रॉन ड्रग्ज विक्रीसाठी आले असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी दोघांची झडती घेतली असता दोघांकडे 116 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज आढळून आले. ड्रग्ज, दोन दुचाकी, रोख रक्कम, दोन मोबाईल फोन असा एकूण 13 लाख 35 हजार 590 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी हे ड्रग्ज गोरेगाव मुंबई येथून महंमद शकील उर्फ गुप्ता (रा. भगतसिंगनगर, गोरेगाव, मुंबई) याच्याकडून आणला असल्याचे सांगितले. त्यामुळे महंमद शकील उर्फ गुप्ता याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.