Wakad : आयुर्वेद स्पाच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कारवाई; दोन महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – आयुर्वेद स्पाच्या नावाखाली (Wakad) सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने भांडाफोड केला. या कारवाईमध्ये पोलिसांनी दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. ही कारवाई बुधवारी (दि. 11) सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास व्हिजन वन मॉलमध्ये राया आयुर्वेदा स्पा येथे करण्यात आली.

स्पा मॅनेजर प्रदीप उर्फ जानवी शंकर जाधव (रा. वाकड), स्पा चालक मालक प्रशांत रामचंद्र सोनवणे (रा. चौसाळा, जि. बीड), सचिन रतन केदारी (रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिला पोलीस अंमलदार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे व्हिजन वन मॉलमध्ये एका स्पा सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी राया आयुर्वेद स्पा या दुकानाच्या परिसरात सापळा लावला.

Chikhali : चिखली येथे पकडले 116 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज ,अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एक बनावट गिऱ्हाईक पाठवून खात्री करत पोलिसांनी दुकानात छापा मारून कारवाई केली. प्रदीप जाधव हा स्पा सेंटरमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. तर प्रशांत सोनवणे आणि सचिन केदारी हे या मॉलचे चालक मालक आहेत.

आरोपींनी दोन महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून (Wakad) स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करून घेतला असल्याचे उघड झाले आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी दोन पिडीत महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.