Chikhali : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाला सिमेंट ब्लॉकने मारून त्याचा खून केला. हा प्रकार तळवडे येथील त्रिवेणीनगर ते तळवडे रोडवरील मोकळ्या मैदानात आज, बुधवारी (दि. 8) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास उघडकीस आला आहे.

उमेश सुरेश पवार (वय 30, रा. दळवी नगर, ओटास्कीम, निगडी) खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अनिल बबन धायगुडे (वय 33, रा. तळवडे, रुपीनगर) याला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत उमेश याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी धायगुडे याला होता. त्यातून त्याने मयत उमेश याच्या डोक्यात सिमेंटच्या ब्लॉकने मारून त्याचा खून केला.

हा प्रकार आज सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास त्रिवेणीनगर ते तळवडे रोडवरील मोकळ्या मैदानात उघडकीस आला आहे. पोलिसांनी धायगुडे याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.