Chikhali : बंद घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – बंद घराचे लॉक तोडून घरातून रोख रक्कम आणि बँक अकाऊंटमधून असा एकूण 59 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 19) पहाटे मोरेवस्ती चिखली येथे उघडकीस आली.

भरत प्रल्हाद वाडिले (वय 35, रा. अंगणवाडी सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भरत मोरेवस्ती मधील अंगणवाडी सोसायटीमध्ये संतोष धस यांच्या खोलीत भाड्याने राहतात. ते रविवारी रात्री अकराच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी घराला कुलूप लावले होते. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन तसेच त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यामधून 47 हजार रुपये असा एकूण 59 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरला. यावरून भरत यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.