Chikhali : घरफोडी करून पाऊण लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे 73 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 28 ते 29 ऑक्‍टोबर 2019 दरम्यान राजे शिवाजीनगर, चिखली येथे घडली.

किरण किसन ऐरंडे (वय 46, रा. मोरया बंगलो, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ते 29 ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत फिर्यादी किरण यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून लॅपटॉप, मोबाईल व सोन्याचे दागिने असा एकूण 73 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.