Chikhali crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे अपहरण अन लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – नातेवाईकाच्या ओळखीने घरात जाऊन महिलेशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला पळवून नेऊन एका कंपनीच्या गोडाऊनमध्ये वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन पंडित चव्हाण (वय 24, रा. आरेगाव, ता. पुसद, जि. यवतमाळ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला मागील काही दिवसांपूर्वी चिखली परिसरात समोरासमोर राहण्यास होते.

महिलेचा नातेवाईक आणि आरोपी एकाच गावातील असल्याने त्यातून आरोपी हा महिलेच्या घरी येत असे. त्यातून पीडित महिला आणि सचिन यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.

त्यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केले. तिला खासगी वाहनातून रांजणगाव येथे पळवून नेऊन एका कंपनीच्या गोडाऊनमध्ये तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.