Chikhali Crime News : भाड्याच्या जागेत परस्पर धार्मिक मूर्तीची स्थापना करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दुसऱ्याच व्यक्‍तीने भाडेतत्वावर घेतलेल्या जागेत परस्पर धार्मिक मूर्तीची स्थापना करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 14 आणि 15 ऑगस्ट रोजी चिखली येथे घडली.

योगेश काळू खंडाळे (रा. मोरेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्रफुल्ल गोविंद काळे-पाटील (वय 29, रा. आकुर्डी) यांनी सोमवारी (दि. 16) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या मालकीच्या जागत पत्राशेड तयार करून ते सतीश बाठे याला भाड्याने दिले. सतीश हा खून प्रकरणात सध्या येरवडा तुरूंगात आहे. यामुळे भाडेतत्वावर घेतलेली ही जागा त्याने त्याची पत्नी दीपाली साठे आणि आरोपी योगेश खंडाळे याच्याकडे चालविण्यास दिली. मात्र, योगेश याने भाडेतत्वावरील या जागेत बेकायदेशीरपणे टपऱ्या टाकून त्याचे भाडे स्वतःला घेतले.

14 ऑगस्ट रोजी येथील भाड्याच्या पत्राशेडमध्ये धार्मिक मूर्ती आणून ठेवली. यामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्‍यता असतानाही याकडे दुर्लक्ष केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.