Chikhali Crime News : तळवडे स्मशानभूमीत महिलेसोबत गैरवर्तन; दोघांवर गुन्हा दाखल

0

एमपीसी न्यूज – पगार आणि कामासाठी महिलेला घराबाहेर बोलावून दोघांनी तिला दुचाकीवरून तळवडे येथे नेले. तळवडे स्मशानभूमीत तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना मंगळवारी (दि. 16) दुपार तीन वाजता मोरेवस्ती- चिखली ते तळवडे स्मशानभूमी येथे घडली.

नवनाथ आटपाडकर, नरेश चौधरी (दोघे रा. गायकवाडवस्ती, कुरुळी, चाकण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांची मैत्रीण या दोघी मिळून आरोपींना हाऊसकिपींगच्या कामासाठी कामगार पुरविण्याचे काम करतात. मंगळवारी दुपारी आरोपी नवनाथ आणि नरेश दोघेजण फिर्यादी महिलेकडे आले.

_MPC_DIR_MPU_II

पगार आणि कामासाठी घराबाहेर बोलवून तिला दुचाकीवरून तळवडे स्मशानभूमी येथे नेले. तिथे नवनाथ याने महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर आरोपी नरेश याने महिलेला घरी सोडविले.

घरी सोडवल्यानंतर ‘मी लांबून तुमचा व्हिडीओ बनवला आहे. तू कोणाला काही सांगू नको’ अशी धमकी नरेश याने दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.