Chikhali Crime News : चिखली, वाकड, हिंजवडी पोलीस ठाण्यात स्त्री अत्याचाराचे तीन गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – चिखली, वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात स्त्री अत्याचाराचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चिखली पोलीस ठाण्यात 25 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती बसवराज जगन्नाथ जवळगेकर, सासरे जगन्नाथ सिद्धारामाप्पा जवळगेकर, दीर सिद्धेश्‍वर जवळगेकर, नंदावा सुनील मोहळकर तसेच सासू आणि दोन नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 1 मे 2017 लग्नाच्या एक महिनानंतर ते आठ ऑगस्ट 2018 या कालावधीत लातूर व औरंगाबाद येथे घडली. लग्न झाल्यापासून फिर्यादी सासरी नांदत असताना आरोपींनी आपसांत संगनमत करून “तू तुझ्या आई-वडिलांकडे कधीही जायचे नाही. लग्नामध्ये आमची कसलीही हौस झाली नाही.

या कारणावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच इतर आरोपींच्या सांगण्यावरून आरोपी पती बसवराज याने फिर्यादी यांना वेळोवेळी मारहाण केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

वाकड पोलीस ठाण्यात 25 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती सचिन गौतम बोकेफोडे (वय 37), सासरे गौतम विठ्ठल बोकेफोडे (वय 60), सासू आणि नणंद (सर्व रा. यमुनानगर, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 2011 ते 11 सप्टेंबर 2021 या कालावधीत वाकड येथे घडली. आम्हाला मुलगा पाहिजे होता. परंतु, तुला मुलगी झाली, या कारणावरून टोचून बोलत आरोपींनी फिर्यादी यांचा छळ केला. तसेच पतीने शिवीगाळ करीत मारहाण केली.

पतीचे चैत्राली नावाच्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. एप्रिल 2021 पासून पती फिर्यादी विवाहिता आणि त्यांच्या दोन मुलांना सोडून दुसरीकडे राहण्यास गेले आहेत. तसेच घरभाडेही भरले नाही. फिर्यादी यांच्या घरात राशन न भरल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

हिंजवडी पोलीस ठाण्यात 28 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती सागर नागटिळक, सासरे मारूती नागटिळक, दीर सुजित नागटिळक आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 2 जुलै 2017 ते 19 जून 2021 या कालावधीत बालेवाडी, मोहननगर, बाणेर, पुणे येथे घडली. आरोपींनी आपसांत संगनमत करून पैशाच्या तसेच घरगुती कारणावरून फिर्यादी विवाहिता यांचा शारीरिक व मानसिक छळ केला.

तसेच आरोपी पती याने ‘तुला बाळ होऊ देणार नाही’, अशी धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.