Chikhali crime News : दुकानात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – कपड्यांच्या दुकानात काम करत असलेल्या महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना 22 सप्टेंबर रोजी चिखली परिसरात घडली. याबाबत 1 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनियन कुंज (रा. पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर रोजी फिर्यादी महिला कपड्याच्या दुकानात काम करत होती. दुपारी दीडच्या सुमारास आरोपी महिलेजवळ आला. त्याने ‘तू खूप मस्त दिसतेस, मला खूप आवडतेस’ असे मल्याळी भाषेत म्हटले. तसेच महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला.

घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास आई, वडील आणि बहिणीला मारून टाकण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.