Chikhali : विवाहितेच्या छळ प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – घरगुती कारणांवरून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊन विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 3 डिसेंबर 2017 ते 5 फेब्रुवारी 2020 या कालावधीत चिखली येथे घडली.

पती अविनाश जालिंदर पवार, सासू संगीता जालिंदर पवार, सासरे जालिंदर साहेबराव पवार (सर्व रा. चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 24 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना घरगुती कारणावरून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला. आरोपी सासूने फिर्यादी यांना न सांगता त्यांच्या माहेरी जाऊन बुलेट घेण्यासाठी 80 हजार रुपये आणले. फिर्यादी यांचे वडील घरी आले असता त्यांनाही शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादी म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.