Chikhali : वाहनाच्या धडकेत वृध्द ठार

एमपीसी न्यूज – पायी जाणार्‍या एका वृद्धाला वाहनाची धडक बसली. त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना 14 मार्च रोजी चिखली – कुदळवाडी येथे घडली.

छोटेलाल रामदत्त जैस्वाल (वय 90, रा. कुदळवाडी) असे ठार झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा नातू अखिलेश रामसबद जैस्वाल (वय-30) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीचे आजोबा छोटेलाल जैस्वाल 14 मार्च रोजी कुदळवाडीतील बालघरे पेट्रोल पंपाच्या समोरून पायी जात होते. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या छोटेलाल जैस्वाल यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती न देता वाहन चालक पसार झाला. फौजदार बागुल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.