Chikhali : महापालिकेतर्फे 210 लाभार्थ्यांना हक्काचे घर; महापौरांच्या हस्ते काढली संगणकीकृत सोडत

एमपीसी न्यूज – केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर 17 आणि 19 चिखली येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या घरकुल प्रकल्पातील 5 सोसायट्यांच्या इमारतीमधील एकूण 210 लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत काढण्यात आली. 210 लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळाले आहे.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येशे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते संगणकीय सदनिका सोडत काढण्यात आली. सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, आण्णा बोदडे, कार्यालयीन अधीक्षक महेंद्र चौधरी, मुख्य लिपिक सुनील माने, राजेश जाधव, लिपिक अंजली खंडागळे, मोहिद्दीन शेख, सुवर्णा केदारी, संकेत लोंढे तसेच समन्वयक अशोक हंडीबाग, दर्शन शिरुडे, अश्विनी शिंदे, आरती शहारे यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थासाठी तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्यात आलेल्या सोसायटी क्र. 125 इमारत क्र. डी-24 चे अध्यक्ष अनिल गंगारात भोसले, सोसायटी क्र. 126 इमारत क्र. डी-23 चे अध्यक्ष प्रल्हाद रामभाऊ कांबळे, सोसायटी क्र. 127 इमारत क्र. डी-21 चे अध्यक्ष गोविंद गुंडेराव तांबवाडे, सोसायटी क्र. 128 इमारत क्र. सी-33 चे अध्यक्ष संजय कोंडिबा शिंदे व सोसायटी क्र. 129 इमारत क्र. डी-22 चे अध्यक्ष गजानन कडू बेदरे यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी लाभार्थींनी हक्काचे व स्वत:चे घर मिळाल्याने इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करावे. घराचा वापर स्वत: करावा. परिसर स्वच्छ ठेवावा. इमारतींभोवती झाडे लावून. त्याचे योग्य प्रकारे निगा व जतन करावे, असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी लाभार्थ्यांना केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.