Chikhali : ‘एक दिवा त्यांच्यासाठी’ या संकल्पनेतून दिपोत्सव साजरा

एमपीसी न्यूज-  केसर व्हॅली हाऊसिंग सोसायटी पाटील (Chikhali) नगर चिखलीमध्ये प्रथमच दीपोत्सव साजरा करण्यात आला. एक दिवा त्यांच्यासाठी या संकल्पनेतून ‘केसर’ हा उत्सव साजरा करण्यात आला.

केसर व्हॅली सोसायटीमध्ये भारतीय सीमेवरती रक्षण करणाऱ्या जवानांच्या आदरांजलीसाठी, तसेच महापुरुषांच्या स्मरणार्थ एक दिवा त्यांच्यासाठी हा उपक्रम उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.

हा उपक्रम साजरा करण्यासाठी सोसायटीचे सांस्कृतिक (Chikhali) कमिटीचे अध्यक्ष सुनील चव्हाण तसेच स्नेहल औटी, श्रद्धा भोसले, पूजा जामगे, पोर्णिमा पाटील या व इतर सर्व महिला व पुरुष सभासद यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.