Talegaon Crime : पती – पत्नीच्या भांडणात पत्नीचा मृत्यू

एमपीसी न्यूज :  पती-पत्नीच्या भांडणात पत्नी जखमी (Talegaon Crime) झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना तळेगाव दाभाडे शहरात घडली.

तुळशी पतलावत (वय 35 वर्षे, रा. तळेगाव दाभाडे) या महिलेचा मृत्यू झाला आहे. आरोपी पती देवराम पतलावत (वय 40 वर्षे) याच्या विरोधात भा.द.वि कलम 302 अंतर्गत अन्वये तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना, किरण पठारे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे) म्हणाले, की गुरुवारी दुपारी एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. तपासात माहिती (Talegaon Crime) मिळाली, की तुळशी पतलावत या त्यांच्या आई व मुलांबरोबर घरी होत्या. त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांनी दवाखान्यात न्यावे असे घरच्यांना सांगितले. त्यामुळे घरचे लोक बाहेर रिक्षा बोलावण्यास गेले. ते परत आल्यावर त्यांना कळाले की तुळशी यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. त्या महिलेला शहरातील जनरल दवाखान्यात नेण्यात आले. तिथे त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मृतदेहाचे शव विच्छेदन करण्यात आले व मृतदेह अंतिम संस्कारसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

संध्याकाळी या घटनेबाबत आकस्मिक मृत्यू म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यांच्या शव विच्छेदन अहवालात मृत्यू आंतरिक जखमांमुळे झाल्याचे समोर आले.

तपासात कळाले, की पती पत्नीमध्ये भांडण झाले होते. पतीने तिला मारहाण केली होती.

Today’s Horoscope 28 October 2022 : आजचे राशीभविष्य 28 ऑक्टोबर 2022

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.