Chinchwad : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरूच; आणखी 243 जणांवर गुन्हे

एमपीसी न्यूज – संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे सत्र सुरूच आहे. काल (गुरुवारी) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 243 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत विनाकारण घराबाहेर फिरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. असे असतानाही नागरिक घराबाहेर घुटमळत आहेत. अशा विनाकारण घराबाहेर घुटमळणार्‍या नागरिकांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये, यासाठी पेट्रोल पंपावर देखील केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोल, डिझेल देण्याचे आदेश पेट्रोल पंप चालकांना देण्यात आले आहेत. तरी देखील अनेकजण दुचाकी आणि चारचाकी घेऊन फिरताना आढळून येत आहेत. पोलीस अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करत त्यांची वाहने देखील जप्त करत आहेत.

गुरुवारी करण्यात आलेली कारवाई –
पिंपरी – 03
चिंचवड – 25
भोसरी – 17
निगडी – 11
दिघी – 13
आळंदी – 09
चाकण – 19
वाकड – 20
हिंजवडी – 35
सांगवी – 28
चिखली – 25
तळेगाव दाभाडे – 27
तळेगाव एमआयडीसी – 06
म्हाळुंगे चौकी – 05
एकूण – 243

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.