Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानच्या गणेशमूर्ती दान उपक्रमात 52 हजार मूर्ती आणि 33 टन निर्माल्यदान

एमपीसी न्यूज- संस्कार प्रतिष्ठान आणि डॉ डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या गणपतीदान आणि निर्माल्यदान उपक्रम यशस्वी करुन एक नवीन उच्चांक प्रस्थापित केला. या उपक्रमात तब्बल 52 हजार 577 गणेशमूर्तीचे दान व 33 टन निर्माल्य संकलित करण्यात आले.

पिंपरी- चिंचवड शहरातील थेरगाव पुल घाट, काळेवाडी, वाल्हेकरवाडी, मोरया गोसावी, केशवनगर, गणेश तलाव, मोरवाडी या ठिकाणी सलग १० दिवस हे अभियान राबवण्यात आले. त्याशिवाय गणेशोत्सवामध्ये संपूर्ण 11 दिवस चिंंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सायंकाळी 4 ते रात्री 12 पर्यंत बंदोबस्तासाठी व वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष पोलीस अधिकारी म्हणून 180 सभासद मदत करत होते. यामध्ये महिला बचत गट आणि डॉ वाय पाटील फार्मसी महाविद्यालय एन एस एस चे 80 विद्यार्थी सहभागी झाले होते.

अनंतचतुर्दशीच्या दिवशी चापेकर चौकात मिरवणूक शांततेत पारडण्यासाठी मदत केली पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन आणि अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव व चिंंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे या सर्वांच्या मार्गदर्शनाली हा बंदोबस्त करण्यात आला.

गणेशमूर्ती दान व निर्माल्य संकलन उपक्रमाचा तपशील

दिडदिवसाचे गणपतीदान

थेरगाव पुल घाट 625
काळेवाडी 325 वाल्हेकरवाडी 675
मोरया गोसावी 18 केशवनगर 125
एकुण 1766
3 टन निर्माल्यदान

गणपतीदान 5 वा दिवस

वाल्हेकरवाडी घाट 2850
थेरगाव पुल घाट 3120
अजमेरा कॉलनी 525
केशवनगर 45
काकडेपार्क व बिर्ला हौदातील 85
एकुण 11080
6 टन निर्माल्यदान

गणपतीदान दिवस 6 वा

थेरगाव पुल घाट 3327
काळेवाडी 450
काकडेपार्क 125
मोरया गोसावी 20
मोशी 325
एकुण 4247
3 टन निर्माल्यदान

गणपतीदान 7 वा दिवस

थेरगाव पुल घाट 5623
मंडळाच्या मुर्ती 20
हौदातील 25
रावेत वरुन 150
दिघी 800 केशवनगर 25
गणेश तलाव 150
मोरवाडी 323
एकुण 7118
6 टन निर्माल्यदान
एकुण 24211 मुर्तीदान व 17 टन निर्माल्यदान

गणपतीदान 9 वा दिवस

थेरगाव पुल घाट 235
रावेत/वाल्हेकरवाडी 180
मोरवाडी/आजमेरा 80
काकडेपार्क 20
विनोदेवस्ती 24
मोठी मंडळे 7
निर्माल्य 2 टन
एकुण 507 मुर्तीदान

गणपतीदान 10 वा दिवस

चिंंचवड 326
काकडेपार्क हौदातील 130
वाल्हेकरवाडी हौदातील 439
मोरया गोसावी घाट 15
एकुण 909
निर्माल्य 1 टन

गणपतीदान 11 दिवस

21365 + 135 हौदातील + मोठी मंडळे 57
21557 फक्त चिंंचवड
दिघी 580
अजमेरा 303
वाकड 1025
काळेवाडी 125
वाल्हेकरवाडी हौदातील 3035
काकडेपार्क 325
एकूण 5393
एकूण गणपतीदान 26950
निर्माल्यदान 13 टन

एकूण गणपतीदान 52577
एकूण निर्माल्यदान 33 टन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.