Chinchwad : श्रीराम कथेत बंधू प्रेमाचे अदभूत दर्शन – रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक

एमपीसी न्यूज – श्रीराम कथेच्या प्राचीनतेमुळे (Chinchwad) आणि सौंदर्यामुळे ही कथा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. श्रीराम कथेत भक्तीचे दर्शन दिसून येते. श्रीराम कथेतील पितृ आज्ञेचा संदेश मिळतो. जो मनाला रमवितो तो राम. श्रीराम कथेने देशाच्या आणि काळाच्या सीमा ओलांडल्या आहे. रामाच्या चरित्राने मनुष्याला कठीण प्रसंग सामोरे जाण्याला शिकविले. श्रीराम कथेत बंधुप्रेमाचे अदभूत दर्शन घडते असे प्रतिपादन रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांनी रविवारी (दि.4) फेब्रुवारी रोजी सातव्या दिवशी श्रीराम कथेत भाविकांसमोर बोलतांना केले.

प्रसंगी आमदार महेशदादा लांडगे, माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे,राज्य संघटक शिवसेना एकनाथ पवार,माजी गटनेते राहुल कलाटे, माजी महापौर राहुल जाधव, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, युवा सेना प्रमुख पिंपरी चिंचवड चेतन पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे खाजगी सचिव आनंद रामटेके, विशेष कार्यकारी अधिकारी हिरालाल मोरे व अमोल यांची उपस्थिती लाभली.

श्रीराम कथेसाठी आलेल्या भाविकांनी मंडपात तुडूंब गर्दी केली होती. सुमारे 17 हजार श्रोत्यांनी राम कथा श्रवण केले. सात दिवस चाललेल्या या रामकथा सोहळयाचा प्रारंभ प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजन करुन प्रारंभ करण्यात आली.रामराव महाराज ढोक म्हणाले की, श्रीराम कथा संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी महत्वपूर्ण ग्रंथ आहे. संतांकडे आशीर्वाद मागावा लागत नाही. संतांची कृपादृष्टीचा लाभ महत भाग्याने मिळते. सानप बंधूनी आपल्या सेवाकार्यामुळे या परिसराचे नंदनवन केले,आध्यात्माचा संगम घडवून आणला.

Pune : श्रीहरीकीर्तानोत्तेजक सभेचे कीर्तन संमेलनाची सांगता; कीर्तनकारांचा सन्मान सोहळा संपन्न

श्रीराम कथा श्रवण करण्यासाठी हजारो भाविकांच्या उपस्थितीने पहिल्या दिवसापासून विक्रमी गर्दी केल्याने कार्यक्रमाचे भव्य दिव्यता वाढले. कार्यक्रमाचे आयोजक सचिन (Chinchwad) प्रभाकर सानप यांनी भविष्यात असाह्य श्रीराम भक्तांना अयोध्येला श्रीरामाच्या दर्शनासाठी तीर्थयात्रा करावे असे आवाहन. श्रीकृष्ण मंदिराचा जीर्णोद्धार शुभारंभ करताना केले. कृष्णानगर मध्ये श्रीकृष्णाचा भव्य दिव्य मंदिर निर्माण कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे असेही रामरावजी महाराज ढोक यांनी केले.

रामराव महाराज ढोक यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सचिन सानप यांनी श्रीराम भक्तांना श्रीराम प्रभूंच्या दर्शनासाठी अयोध्येला नेण्याचा संकल्प जाहीर केला व राम कथेच्या आयोजनामुळे आम्हा सानप परिवाराचा संकल्प सिद्धीस गेल्याने परमोच्च आनंद व आत्मिक समाधान मिळाल्याचे सांगितले. सात दिवस चाललेल्या कार्यक्रमांमध्ये परिसरातील सर्व मठ, मंदिरांचे विश्वस्त, सार्वजनिक मंडळे, तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे सर्व उपस्थित सहभाग आणि उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. महाआरती व प्रसादाने कार्यक्रमाचे सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.