Chinchwad: विधानसभा अध्यक्षांना रिझनेबल टाईम समजतो – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – 16 आमदार पात्र की अपात्र यावर विधानसभेच्या (Chinchwad) अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाने यासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना रिझनेबल टाईममध्ये निर्णय घ्या असे सांगितले असून अध्यक्षांना रिजनेबल टाईम समजतो असे विधान राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तरी, अध्यक्ष दबावाला बळी पडणार नाहीत, असेही ते म्हणाले.

पिंपरीमध्ये महापालिकेच्या विविध प्रकल्पांच्या लोकार्पणाच्या वेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले 16 अपात्र आमदारांच्या बाबतीत उद्धव ठाकरे लोकशाहीत बसणारे कृत्य करीत आहेत का? विधानसभा अध्यक्षांना घेराव घालू, त्यांना चालू देणार नाही अशी भाषा त्यांच्याकडून केली जात आहे. ही भाषा लोकशाहीत बसणारी आहे का याचा विचार त्यांनी करावा. आपली बाजू कमकुवत असेल तर अशा प्रकारची विधाने होत असतात.

Chinchwad : महाराष्ट्रात दंगली घडवू देणार नाही – देवेंद्र फडणवीस

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निष्णात वकील आहेत.त्यांना कायदा चांगला समजतो. अनेक वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केली आहे. त्यामुळे (Chinchwad) सुप्रीम कोर्टाने रिझनेबल टाईम मध्ये 16 अपात्र आमदारांच्या बाबत निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. त्यामुळे ते रिझनेबल टाईम मध्ये योग्य तो निर्णय देतील असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले. राहुल नार्वेकर कोणतीही बेकायदेशीर काम करणार नाही कोणी कितीही दबाव आणला तरी ते कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय देतील असे देखील फडणवीस म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.