Chinchwad : पालिकेवर पुन्हा भाजपचीच सत्ता – अश्विनी जगताप

एमपीसी न्यूज – आगामी काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Chinchwad) सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.  पुन्हा एकदा महापालिकेवर भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वास आमदार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला.

माजी महापौर उषा ढोरे , भाजपचे प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य शंकर जगताप, मोदी@9 चे चिंचवड विधानसभा संयोजक  व जिल्हा सरचिटणीस अॅड. मोरेश्वर शेडगे , माजी पक्षनेते नामदेव ढाके , “मोदी@9” प्रदेश सदस्य संतोष कलाटे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष संकेत चोंधे, महिला मोर्चा शहर अध्यक्षा उज्वला गावडे, “मोदी@9” अंतर्गत अभियानांचे  संयोजक शत्रुघ्न काटे , संदीप कस्पटे, राजेंद्र चिंचवडे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, बाळासाहेब ओव्हाळ, सागर आंघोळकर, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य संदीप गाडे,भाजपा सांगवी काळेवाडी मंडल अध्यक्ष विनोद तापकीर, चिंचवड किवळे मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे आदी प्रमुख उपस्थित होते.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील नऊ वर्षात सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून विकास प्रकल्प राबविण्यात आले. या विकास प्रकल्पांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष लाभ देशभरातील सर्व थरातील महिला, कष्टकरी कामगार यांना झाला आहे.

या विविध विकास प्रकल्पांची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली देशात आणि राज्यात “मोदी@9” हे जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.

त्या अंतर्गत चिंचवड विधानसभा तसेच मावळ लोकसभा मतदार (Chinchwad) संघात हे अभियान राबविण्यात आले. या द्वारे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क साधला असून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील एक लाख कुटुंबांपर्यंत पोहचण्याचा भाजपाचा संकल्प असल्याचे जगताप यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.