Chinchwad Bye Election : जोरदार शक्तीप्रदर्शन करत अश्विनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या  भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम युतीच्या (Chinchwad Bye Election) उमेदवार अश्विनी  लक्ष्मण जगताप यांनी आज (सोमवारी) जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

थेरगाव येथील निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी महापौर उषा ढोरे, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे,  चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्यासह माजी नगरसेवक, पक्षाचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते  मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Pune News : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पुण्यात शिक्षकांसाठी योग शिबीर

तत्पूर्वी, भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील जनसंपर्क कार्यालयापासून सकाळी 9 वाजता पदयात्रेला सुरूवात झाली. गावातील भैरवनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सृष्टी चौक, सुदर्शननगर, जवळकरनगर, कल्पतरू फेज 1, सुदर्शन चौक, स्वराज गार्डनमार्गे पिंपळेसौदागर गावठाण पुढे शंकर मंदिर, रहाटणी चौक, विमल गार्डन, बळीराज गार्डन, कुणाल गार्डन, (Chinchwad Bye Election) बापुजी बुवा मंदिर, थेरगाव हॉस्पिटलमार्गे ग प्रभाग कार्यालयापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली.

चिंचवड विधानसभा क्षेत्रामध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली असल्याने, ही निवडणूक मी निश्चितच जिंकणार असा विश्वास अश्विनी जगताप यांनी शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.