Chinchwad Bye-Election: भव्य दुचाकी रॅलीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचाराची सांगता

एमपीसी न्यूज  – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या (Chinchwad Bye-Election) पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी शुक्रवारी (दि.24) भव्य दुचाकी रॅली काढत प्रचाराची सांगता केली.

या फेरीची सुरवात चिंचवड येथील महासाधू  मोरया गोसावी यांच्या समाधी मंदिरापासून झाली. उघड्या जीपमधून राहुल कलाटे मतदारांना अभिवादन करत होते. पाठिंबा दिलेल्या संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही दुचाकी रॅलीत सहभागी झाले होते. क्रांतिवीर चापेकर चौकमार्गे दर्शन नगरी सोसायटीजवळील पुलावरून  काळेवाडीमधील पंचनाथ चौकात दुचाकिफेरी आली. तेथून छत्रपती चौक, राहटणी येथे दुचाची रॅली  पुढे तापकीर नगरमध्ये तरुणांनी जेसीबीवरून कलाटे यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर पिंपळे सौदागर, वरुण पार्क सोसायटी येथेही पुष्पवृष्टी करण्यात आली.

त्यानंतर शिवार गार्डन-राहटणी, कोकणे चौक, शिवराज नगर-राहटणी, धर्मवीर संभाजी महाराज चौक, कस्पटे वस्ती येथे दुचाकी रॅली पोहोचली. वाकड येथे रॅलीची सांगता करत प्रचाराचीही सांगता झाली.

”माझी निवडणूक चिंचवडमधील जनतेनेच हातात घेतली. (Chinchwad Bye-Election) माझ्यासोबत कोणताही नेता नव्हता, जनता होती आणि आहे. जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला. ना हा पक्ष, ना तो पक्ष, चिंचवड विधानसभेच्या विकासासाठी मी अपक्ष लढतोय. चिंचवडमधील जनतेला बदला हवा आहे.

चिंचवडची जनता नक्कीच बदेल करेल.  जनतेच्या आशिर्वादाने आणि ताकदीने चिंचवडमध्ये इतिहास घडेल आणि माझा विजय होईल”, अशी प्रतिक्रिया राहुल कलाटे यांनी प्रचाराच्या सांगतेनंतर दिली.

Pune Bye-Election : भाजपने पोलिसांसोबत कसब्यात वाटले पैसे; रवींद्र धंगेकर यांचा आरोप

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.