Talegaon Dabhade : रोटरी तर्फे ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळास वॉटर कुलर भेट

एमपीसी न्यूज – जेष्ठ नागरिक संघाच्या दादादादी पार्क (Talegaon Dabhade) येथे आधुनिक वॉटर कुलर बसविण्यात आला. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून रोटेरियन प्रदीप मुंगसे आणि त्यांचे बंधू मोरेश्वर मुंगसे यांनी त्यांचे वडील स्व नारायणराव मुंगसे यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविला. वॉटर कुलरचे उद्घाटन रोटरीचे प्रांतपाल शितल शहा यांनी केले. या वॉटर कुलरचा पार्कमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला फायदा होणार आहे.

रोटरीचे प्रांतपाल शितल शहा यांनी रोटरी क्लब तळेगाव सिटीचे अध्यक्ष दीपक फल्ले आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन केले. इथून जाताना या क्लबच्या विविध उपक्रमातून मी एक कार्यक्षमतेची ऊर्जा घेऊन जात आहे तीच ऊर्जा मला माझ्या प्रांतपाल पदाच्या काळात मोठी संजीवनी ठरेल असे गौरवोद्गार काढले. याप्रसंगी रोटरी सिटीचे दिलीप पारेख, विलास काळोखे, किरण ओसवाल, सुरेश शेंडे, शाहीन शेख, रेश्मा फडतरे, शरयू देवळे, संजय मेहता हे प्रमुख उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुधाकर रेम्बोटकर यांनी रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले. संस्थेला हे वॉटरकुलर उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.

रोटरी सिटीचे अध्यक्ष दिपक फल्ले यांनी ज्येष्ठांच्या सेवेची संधी आम्हाला दिली, हे आम्ही आमचे भाग्य समजतो, असं आपल्या मनोगतात व्यक्त केले.

संघाचे उपाध्यक्ष डॉ. शाळीग्राम भंडारी यांनी रोटरीने आयोजित केलेला हा उपक्रम पाहणाऱ्याला अगदी छोटा वाटत असला तरी तो संवेदनशील समाजाला संदेश देणारा निश्चितच (Talegaon Dabhade) ठरेल, असे आपले मनोगत व्यक्त केले.

माजी नगराध्यक्ष मीरा फल्ले आणि विठ्ठल कांबळे या दोघांनीही या अत्यंत उपयुक्त अशा रोटरीच्या उपक्रमाबद्दल संस्थेतर्फे कृतज्ञता व्यक्त केली.

रोटरी क्लब तळेगाव सिटी आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुसंख्य सभासद उपस्थितीने हा कौटुंबिक समारंभ खरोखरच अतिशय देखणा आणि प्रसन्न करणाराच होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विठ्ठल राव कदम यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन मुंगसे परिवार व रोटरी सिटीच्या सदस्यांनी केले.

Alandi News : इंद्रायणी नदीपात्र पुन्हा रसायनयुक्त पाण्याने फेसाळले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.