Chinchwad Bye-Election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी युवक राष्ट्रवादी मैदानात

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी आज मोठे शक्तीप्रदर्शन करत तब्बल 250 कार्यकर्त्यांची युवकच्या (Chinchwad Bye-Election) कार्यकारणीवर नियुक्ती केली. थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालय येथे आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे चिंचवड विधानसभा जिंकायचीच या इराद्याने युवकची फळी मैदानात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.

युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता अल्हाट, प्रवक्ते रविकांजी वरपे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. चिंचवड विधानसभेच्या अध्यक्षपदाची धुरा उमेश काटे यांच्याकडे देण्यात आली असून (Chinchwad Bye-Election) उपाध्यक्षपदी सनी माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर सरचिटणीसपदाची संधी विकास कांबळे यांना तर चिंचवड विधानसभेच्या मुख्य संघटकपदी आकाश घोलप तर सरचिटणीसपदी प्रशांत कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रमुख नियुक्‍त्यांसह 14 प्रभाग अध्यक्ष, 42 वॉर्डाध्यक्षांची नियुक्ती करतानाच उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव या पदांवर 200 हून अधिक कार्यकर्त्यांना इम्रान शेख यांनी संधी दिली आहे.

Charholi News : पाणीपुरवठा योजनेबाबत काही नेते खोट बोलून श्रेय घेत आहेत – रोहित पवार

या पदनियुक्ती सोहळ्याचे आयोजन कार्याध्यक्ष निलेश निकाळजे, मनोज जरे, उपाध्यक्ष ओम शिरसागर, दिनेश पटेल, साहिल शिंदे, रुबान शेख, केतन होके, मेघराज लोखंडे, ऋतिक भुजबळ, साहिल शिंदे, अभिषेक जगताप यापदाधिकाऱ्यांनी केले होते.

युवकांवर मोठी जबाबदारी –  जयंत पाटील

कोणत्याही निवडणुकीमध्ये विजय मिळवायचा असेल तर युवकांची ताकद महत्त्वाची असते. चिंचवडचा विजय मिळविण्यासाठी युवकांवर मोठी जबाबदारी असून ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याचे काम युवकची कार्यकारणी करत असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक युवकांनी आपल्या खांद्यावर घेतल्याने येथील विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

काटे यांचा विजय निश्‍चित – इम्रान शेख

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने शहरातील असंघटित, बेरोजगार, बहुजन, सुशिक्षित तरुणांना एकत्रित करून महविकास विकास आघाडीचे (Chinchwad Bye-Election) उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी युवकची कार्यकारणी कामाला लागली आहे. त्यामुळे काटे यांचा विजय निश्‍चित असल्याचे मत इम्रान शेख यांनी यावेळी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.