Talegaon News : तळेगाव येथे जनआक्रोश मोर्चात हिंदूंच्या एकजुटीचे दर्शन, विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांचा उत्स्फूर्त सहभाग

एमपीसी न्यूज – डोक्यावर भगव्या टोप्या,हातामध्ये भगवे झेंडे,‘जय श्रीराम’,‘छत्रपती शिवाजी महाराज  की जयआणि ‘छत्रपती संभाजी महाराज की जय च्या घोषणा अशा वातावरणात निघालेल्या जनआक्रोश  मोर्चाच्या माध्यमातून रविवारी तळेगाव मध्ये (Talegaon News) अखिल हिंदू समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडले. चार वर्षांच्या चिमुरडीपासून 87 वर्षांच्या आजोबापर्यंत अनेक जणांनी तसेच विविध संस्था, संघटना आणि  राजकीय पक्षांनी या मोर्चात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन म्हणजे फाल्गुन अमावस्या‘धर्मवीर दिन’ जाहीर करावा, तसेच लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या यांच्या विरोधात कडक कायदे करून त्यांची अंमलबजावणी व्हावी,या प्रमुख मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.आमदार नितेश राणे, कालिचरण महाराज,आखाडा परिषद उपाध्यक्ष सुनीलशास्त्री महाराज,ऍडव्होकेट मृणाली पडवळ, तसेच शंकर महाराज मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Chinchwad Bye-Election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी युवक राष्ट्रवादी मैदानात

तळेगाव स्टेशन सिद्धिविनायक कॉलनी येथील संतोषी माता मंदिरापासून  मोर्चाला सुरुवात झाली, त्यानंतर हा मोर्चा तळेगाव मधील मारुती चौक येथे आला. मोर्चामध्ये विविध पक्षातील व मावळ मधील अनेक हिंदू संघटनांचा सहभाग होता, वारकरी व महिलांचा विशेष सहभाग होता,तेथे झालेल्या सभेनंतरमोर्चाची सांगताझाली. याप्रसंगी नितेश राणे म्हणाले,”हिंदूनी एकत्र येण्याची गरज आहे कारण येणार काळ हा हिंदूंवर संकटांचा असेल,हा आक्रोश नसून हिंदूंची गर्जना आहे. धर्मांतराच्या विरोधात लढणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. गाय ही आमची माता असून आम्ही गाईची कत्तल होऊ देणार नाही. व लोहगडावरील अनधिकृत बांधकामाविषयी देखील प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे”असे ते म्हणाले. कालिचरण महाराजांनी देखील आपल्या भाषणाची  त्यांच्या खास शिवतांडव स्रोताने सुरुवात केली.

त्यांनी देखील हिंदुजनसमुदायाला भाषणातून हिंदुत्वाचे धडे दिले, त्याचप्रकाने सुनीलशास्त्री महाराजांनी महाराष्ट्र भूमी हि माझे आजोळ आहे व याआजोळाला महानच ठेवायचं असेल तर सर्व हिंदूंनी हातात हात घेऊन लढायला हवं असे ते म्हणाले. भारताला हिंदुराष्ट्र करायचं असेल तर (Talegaon News) असुरी शक्ती ला वधर्मांतरासारख्या गोष्टींविरोधात लढले पाहिजे असेही ते म्हणाले. हिंदू जनगर्जना मोर्चा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी मावळ मधील बजरंग  दल,विश्वहिंदू परिषद,शिवप्रतिष्ठान,  वारकरी संप्रदाय व तसेच विविध पक्षातीलनेत्यांनी सहकार्य केले, मावळमधील व विशेषतः तळेगाव मधील सर्व पक्ष  संघटना नेत्यांनी मोर्चामध्ये एकत्रित येत आपले मतभेद बाजूला ठेऊन सहभागी झाल्याचे दिसून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.