Chinchwad Bye-Election : चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 हजार जणांनी घेतले प्रशिक्षण

एमपीसी न्यूज –  चिंचवड पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Chinchwad Bye-Election) आज (रविवारी)  मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक अशा तीन हजार जणांनी प्रशिक्षण घेतले आहे. हे प्रशिक्षण चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित केले होते.  

निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रशिक्षण सत्रात महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी आणि चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणाचे एकुण 3 टप्पे होणार असून आज पहिला टप्पा पार पडला.यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी किरण गायकवाड, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक बापू गायकवाड, पोस्टल मतदान कक्षाचे समन्वयक राजेश आगळे आदी उपस्थित होते.

Pimpri News : कोश्यारी नावाची महाराष्ट्राची ‘पीडा’ गेली – अजित गव्हाणे

दोन सत्रात आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये मतदान प्रक्रियेविषयी इत्यंभूत माहिती देण्यात आली. निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचना, विविध शासन निर्णय, मतदान यंत्रांची हाताळणी आणि जोडणी कशा पद्धतीने करावी, मतदान यंत्राबाबत तांत्रिक माहिती, मतदान साहित्याची ओळख, मतदान प्रक्रियेवेळी घ्यावयाची काळजी, निवडणूक प्रक्रियेसंबंधी असलेली नियमावली, निवडणूकीची कार्यपद्धती आणि कार्यप्रणाली, विविध नमुन्यांमध्ये भरावयाची माहिती, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे कर्तव्ये आणि जबाबदारी आदींबाबत या प्रशिक्षणामध्ये माहिती देण्यात आली. तसेच मतदान यंत्र हाताळण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देखील यावेळी देण्यात आले. प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे निरसन देखील यावेळी करण्यात आले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी या प्रशिक्षणात निवडणूक कर्मचाऱ्यांना कामकाजाविषयी सूचना दिल्या. (Chinchwad Bye-Election) नियमांचे पालन करुन सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पाडणे, मतदान केंद्रनिहाय नेमण्यात आलेल्या टीमने ईव्हीएम यंत्र हाताळणी व्यवस्थित करणे, विविध नमुन्यातील माहिती योग्य पद्धतीने भरणे, आदी सूचनांचा यामध्ये समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.