Chinchwad Bye Election : मतदारांचा माझ्यावर विश्वास, 2 तारखेला  उत्तर भेटणार – अश्विनी जगताप

एमपीसी न्यूज – आजपर्यंत लक्ष्मण जगताप यांना मतदान करत होते. आज स्वत:ला मतदान केले. दरवेळेला लक्ष्मणभाऊ असायचे, स्वत:ला मतदान करताना हूरहूर वाटली. भाऊंप्रमाणेच मतदारांचा माझ्यावर विश्वास असून 2 तारखेला उत्तर भेटेल अशी प्रतिक्रिया (Chinchwad Bye Election) भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी मतदानानंतर दिली.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील मतदानाला आज (रविवार) सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. अश्विनी जगताप यांनी कुंटुबियांसह पिंपळेगुरव येथे मतदानाचा हक्क बजाविला.

 

Chinchwad News : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

माध्यमांशी संवाद साधताना अश्विनी जगताप म्हणाल्या, सर्वांनी मतदानाला बाहेर पडावे. मतदान हा सार्वभौम हक्क आहे. आजपर्यंत लक्ष्मण जगताप यांना मतदान करत होते. आज स्वत:ला मतदान केले. दरवेळेला लक्ष्मण जगताप असायचे स्वत:ला मतदान करताना हूरहूर वाटली. मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे. मतदार आमच्या कुटुंबाच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे. दोन तारखेला (Chinchwad Bye Election) उत्तर भेटेल. विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविली होती. जगताप यांच्यावर प्रेम करणा-या मतदारांची सहानुभूती देखील होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.