Chinchwad : पोलीस आयुक्तांनी दरबारात जाणून घेतल्या पोलिसांच्या समस्या

एमपीसी न्यूज – पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी (Chinchwad) शहर पोलीस दलातील पोलिसांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दरबार घेतला. यामध्ये पोलिसांनी विविध समस्या आयुक्त चौबे यांच्यासमोर मांडल्या. त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधितांना दिल्या आहेत.

पोलीस ठाणे प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठकांमधून पोलीस आयुक्तांचा संवाद होत असतो. पण इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे ठराविक कालावधीनंतर सर्वांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्तांनी दरबार आयोजित केला होता. निगडी येथे हा दरबार पार पडला. यावेळी सुमारे 300 पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.

उपस्थित पोलिसांनी वैयक्तिक आणि कार्यालयीन अशा सर्व प्रकारच्या अडचणी आयुक्तांपुढे मांडल्या. घरभाडे, वेतनवाढ, बढती याबाबत अडचणी मांडल्या. अनेकांना बदली हवी असल्याने त्यांनी तशी मागणी केली. मात्र एकाच वेळी सर्वांना इच्छित ठिकाणी बदली देणे शक्य नसल्याने इच्छुकांनी विनंती अर्ज करावा, त्यानुसार नियमित बदल्यांमध्ये त्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले.

Maval : मोठी बातमी! सात वर्षीय मुलीच्या अपहरण, खून प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे म्हणाले, “पोलीस दलात काम करत  (Chinchwad) असताना अनेकांना कामाच्या व्यापामुळे मानसिक तणाव जाणवत असतो. त्यात काही वैयक्तिक आणि कार्यालयीन अडचणी असतील तर त्या तणावात वाढ होते. त्यामुळे पोलिसांनी वेळीच वरिष्ठांकडे आपल्या समस्या मांडल्या तर त्यांच्यावरील मानसिक तणाव कमी होतो. त्यासाठी हा दरबार घेण्यात आला. सर्वांच्या अडचणी जाणून घेत त्याबाबत कार्यवाही करण्याच्या संबंधितांना पोलीस आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.