Chinchwad Crime News : मास्क न वापरणाऱ्या 288 बेशिस्त नागरिकांवर कारवाई

एमपीसी न्यूज – मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न पाळणे, तसेच अन्य नियमांना तिलांजली देण्याचे सत्र नागरिकांकडून सुरूच असते. अशा बेशिस्त नागरिकांवर पोलीस कारवाई करीत आहेत. रविवारी (दि. 2) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मास्क न वापरणा-या 288 जणांवर कारवाई केली आहे.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत असताना त्याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन सर्व पातळ्यांवरून केले जात आहे. मात्र तरीही काही नागरिक बेफिकीरपणे राहत आहेत.

रविवारी पोलिसांनी केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (21), भोसरी (17), पिंपरी (15), चिंचवड (25), निगडी (16), आळंदी (19), चाकण (07), दिघी (03), सांगवी (16), वाकड (20), हिंजवडी (31), देहूरोड (17), तळेगाव दाभाडे (21), तळेगाव एमआयडीसी (00), चिखली (14), रावेत चौकी (11), शिरगाव चौकी (25), म्हाळुंगे चौकी (10)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.