Chinchwad crime News: प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 279 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 279 जणांवर भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे. या व्यतिरिक्त प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांची देखील पोलिसांकडून अंमलबजावणी केली जात आहे.

मास्क न वापरणा-या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या लोकांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. या कारवाईसाठी देखील पोलीस सहकार्य करीत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. बुधवारी (दि. 16) केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (2), भोसरी (7), पिंपरी (33), चिंचवड (11), निगडी (21), आळंदी (18), चाकण (0), दिघी (13), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (23), वाकड (79), हिंजवडी (8), देहूरोड (28), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (24), रावेत चौकी (7), शिरगाव चौकी (5).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.