Chinchwad Crime News : डिलरशीपच्या नावाखाली दोन शॉपिंग कंपन्यांनी घातला एक लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – डिलरशीपच्या नावाखाली दोन शॉपिंग कंपन्यांनी एका इसमाला एक लाख रुपयांचा गंडा घातला आहे. ऑगस्ट 2020 ते जानेवारी 2021 या दरम्यान हा प्रकार घडला.

याप्रकरणी प्रतिक प्रविण कांकारिया (वय 30, रा. सुखवानी उद्यान सोसायटी, चिंचवड ) यांनी सोमवारी (दि.24) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार ‘ई टू शॉपी’चे कृष्णा ठाकुर व ‘इंडिया शॉपिंग बाजार’चे अनुश्री पाटीदार व सुजल पटवा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ई टू शॉपी’चे कृष्णा ठाकुर यांनी ‘ओएलएक्स’वर पुणे जिल्ह्यासाठी डिलरशीप बाबत जहीरात दिली होती. डिलरशीप मिळवून देतो असे आमिष दाखवून सिक्युरिटी पोटी पंचवीस हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने घेतले.

तसेच, इंडिया शॉपिंग बाजार’च्या वतीने देखील अशीच जहीरात देण्यात आली होती व आरोपींनी फिर्यादी यांच्या कडून सिक्युरिटी पोटी 75 हजार रुपये घेतले. अशी एकूण एक लाख रुपयांची फसवणूक फिर्यादी यांची केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.