Chinchwad crime : ‘माझ्या पत्नीला पोलीस ठाण्यात का घेऊन गेला’ असा जाब विचारणाऱ्या पतीला बेदम मारहाण

पोलिसांनी नागेश्वर नामदेव वानखेडे (वय 21, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) याला अटक केली आहे. त्याच्यासह त्याच्या अन्य तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – ‘माझ्या पत्नीला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी का घेऊन गेला’ असा जाब विचारल्यावरून चार जणांनी मिळून जाब विचारणाऱ्या पतीला आणि त्याच्या मुलाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 5) दुपारी पाच वाजता चिंचवडेनगर, चिंचवड येथे घडली.

सुरेश विजयकुमार कांबळे (वय 33, रा. स्वामी समर्थ कॉलनी, चिंचवडे नगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी नागेश्वर नामदेव वानखेडे (वय 21, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) याला अटक केली आहे. त्याच्यासह त्याच्या अन्य तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागेश्वर हा फिर्यादी सुरेश यांच्या पत्नीला घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला होता. त्याचा सुरेश यांनी नागेश्वर याला ‘माझ्या पत्नीला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी का घेऊन गेला’ असा जाब विचारला.

तसेच सुरेश यांच्या रिक्षाचा आरोपी नागेश्वरच्या दुचाकीला धक्का लागला. या दोन कारणांवरून आरोपी नागेश्वर आणि त्याच्या तीन साथीदारांनी मिळून सुरेश आणि त्यांच्या मुलाला सळई, फारशी, पीव्हीसी पाईप आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये सुरेश आणि त्यांचा मुलगा जखमी झाले आहेत. पोलिसांनी नागेश्वर याला अटक केली आहे.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.