Chinchwad : भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची  मागणी

एमपीसी न्यूज – सांगवीसह, खडकी, रेंजहिल, पिंपळे गुरव, दापोडी परिसरात (Chinchwad) भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. खडकी बाजार येथे नुकतेच तेरा वर्षाच्या मुलावर तीन कुत्र्यांनी एकाच वेळी हल्ला केल्याने मुलाला मोठी जखम झाली आहे. एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन याकडे लक्ष केंद्रित करणार आहात का ? असा सवाल छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन व महापालिका प्रशासनाला केला आहे.

Gold Rate – आज सोन्याच्या किंमतीमध्ये थोडी घट तर चांदीचा दर 2000 ने कमी 

कुत्र्याने मुलाच्या हाताला तीन चार ठिकाणी कडाडून चावा घेतला. त्यात बालक जखमी झाला आहे. अभिजीत भोसले असे या मुलाचे नाव असून, भर बाजारपेठेत हे कुत्रे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर धावून जात आहेत. त्यामुळे या परिसरातील मोकाट कुत्र्यांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे. अन्यथा या कुत्र्यांचा अनेकांना त्रास होणार आहे.

नागरिकांनी कुत्र्याला हुसकावून लावल्याने सुदैवाने या बालकाची सुटका झाली. मुलाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या कुत्र्याचा चावा इतका भयंकर होता की, कुत्र्याने त्या बालकाच्या हाताचे लचके तोडले आहेत. या आधीही पिंपळे गुरवच्या गजानन नगरमध्ये एका बालकाची कुत्र्याच्या तावडीतून नागरिकांनी सुटका केली आहे. मात्र, हा प्रश्न कायमस्वरूपी सुटायला हवा, अशी मागणीही  जाधव यांनी केली (Chinchwad) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.