BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : महिलेला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – चिंचवड येथे महिलेला सर्वासमक्ष मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधितांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात फौजदारी खटला दाखल झाल्यानतंर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सोमनाथ यादव थरकुडे (वय 40), छाया रोहीदास सावंत, योगीता सोमनाथ थरकुडे, बायडाबाई किसन सावंत (सर्व रा. जोबो वसाहत, चिंचवडेनगर, चिंचवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चिंचवड येथे एक शैक्षणीक संस्था आहे. ती संस्था चालविण्यावरून आरोपी व फिर्यादीमध्ये वाद होता. आरोपी हे फिर्यादीला ‘तू ही संस्था चालवू शकत नाही’ असा वाद घालत होते. फिर्यादी यांच्या शाळेत कार्यक्रम सुरु असताना आरोपी तेथे गेले आणि त्यांनी फिर्यादी यांना केस धरून मारहाण केली तसेच जातीवाचक शिवीगाळ केली.

यावरून चौघांवरही अॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सोमनाथ याच्यावर विनयभंगाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीतेने जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर चिचंवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2