Pune News : ‘एनसी’ दाखल केल्यानंतर पुढे काय होते ? पुणे पोलिसांनी दिली माहिती

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांनी नागरिकांना त्यांच्या अधिकाराची माहिती करून देण्यासाठी ‘नो युवर राईट्स’ हे अभियान सुरू केले आहे. यापूर्वी पोलिसांनी एफआयआर आणि एनसी यातील फरक समजावून सांगत, त्या कशा पद्धतीने नोंदवल्या जातात याची माहिती दिली होती. त्यानंतर आता अभियानाचा पुढचा भाग म्हणून ‘एनसी’ दाखल केल्यानंतर पुढे काय होते ? याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.

पुणे पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडवरती याबाबत माहिती शेअर केली आहे. यामध्ये नॉन कॉग्निझेबल (NC) तक्रार नोंदवल्यानंतर पुढे काय होतं ? ह्याचं आणि अशा अनेक मूलभूत प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

एनसी दाखल केल्यावर काय होते ?

प्रमुख अधिकारी तुमची एनसी ऑक्युरन्स रिपोर्ट (घटना अहवाल) फॉर्ममध्ये नोंदवली जाते. व तुम्हाला त्याची एक शिक्का मारलेली प्रत देण्यात येते. तसेच, ते त्यांच्या नोंदीसाठी घटनेचा सारांश स्पेशल एनसी रजिस्टर मध्ये नमूद करतील.

पोलीस एनसीची चौकशी दाखल केल्यावर काय होते ?

नॉन कॉग्निझेबल (अदखलपात्र) प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार पोलिसांना नाही, ते फक्त त्याची नोंद करू शकतात.

एनसीचा फॉर्म कसा दिसतो ?

ऑक्युरन्स रिपोर्ट (घटना अहवाल) हा एक मुख्य दस्तऐवज आहे ज्यामध्ये घटना घडल्याची नोंद पोलीस करतात. या फॉर्मच्या तीन प्रती असतात. पहिली प्रत तुम्हाला दिली जाते, दुसरी रजिस्टरमध्ये नोंद राहते आणि तिसरी त्या पोलीस स्टेशनला पाठवली जाते ज्याच्या अखत्यारित ती चौकी येते.

एनसी रजिस्टरमध्ये घटनेचा सारांश नोंदवला जातो. तसेच, एनसी संदर्भातील तक्रारी ऑनलाईन माध्यमातून CCTNS सिस्टम मध्ये देखील नोंदवल्या जातात.

इतर दस्तऐवजांचा समावेश असतो का ?

हो, तक्रारीमध्ये समावेश असलेल्या पक्षांना त्यांच्या कृती विरोधातील कायदेशीर परिणामांबद्दल समज देण्यासाठी सीआरपीसी कलम 149 (CrPC 149) नोटीस दिली जाऊ शकते.

FIR नोंदणी प्रत्यक्षरित्या कशी पार पडते ? जाणून घेण्यासाठी खालील बातमी वाचा

FIR Procedure : FIR प्रक्रिया प्रत्यक्षरित्या कशी पार पडते ? जाणून घ्या FIR प्रक्रियेतील 8 पाय-या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.