Sangvi News: तू वांझोटी आहेस, असे म्हणत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – तू वांझोटी आहेस, असे म्हणत तसेच माहेरहून लाखो रुपये आणण्याची मागणी करत पती, सासू, दीर आणि सास-याने मिळून विवाहितेचा छळ केला. हा प्रकार 18 डिसेंबर 2016 ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडला.

पती कपिल वासुदेवराव साटोणे, सासू सुमन वासुदेवराव साटोणे, दीर निलेश वासुदेवराव साटोणे, सासरा वासुदेवराव साटोणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या लोकांनी आपसात संगनमत करून जमीन घेण्यासाठी विवाहितेकडे तिच्या आई वडिलांकडून 10 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. तसेच ‘तुला मूलबाळ होत नाही. तू वांझोटी आहेस. तुला स्वयंपाक येत नाही’ असे म्हणून वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देऊन शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.