Chinchwad crime News : भोसरी, चाकण, तळेगाव, वाकडमधून सव्वा लाखाच्या चार दुचाकी चोरीला

- पिंपरी-चिंचवड शहरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. दररोज वाहन चोरीचे गुन्हे दाखल केले जात आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. दररोज वाहन चोरीचे गुन्हे दाखल केले जात आहेत. यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी (दि. 30) भोसरी, चाकण, तळेगाव आणि वाकड पोलीस ठाण्यात चार वाहन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अज्ञात चोरट्यांनी सव्वा लाखाच्या चार दुचाकी चोरून नेल्या आहेत.

पहिल्या घटनेत प्रफुल अनिल राठोड (वय 22, रा. संतनगर, लोहगाव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी राठोड यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 12 / आरएच 2476) जुना पुणे-मुंबई महामार्गावर कासारवाडी येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या समोर 29 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी अवघ्या अर्ध्या तासात त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार दुपारी एक वाजता उघडकीस आला.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या घटनेत दीपक गोविंद नारळकर (वय 28, रा. चाकण चौक) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी नारळकर यांनी त्यांची 70 हजार रुपये किमतीची रॉयल इनफिल्ड बुलेट (एमएच 09 / ईक्यू 2590) लक्ष्मण नगर, दवणे वस्ती येथे किराणा मालाच्या दुकानासमोर पार्क केली. दुकानातून किराणा माल घेत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 29 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता घडला.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

तिस-या घटनेत गिरीश रामदास शेळके (वय 32, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी शेळके यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 / एएल 6625) 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सोमाटणे येथील अमरजाई दुध डेअरी समोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार दुपारी चार वाजता उघडकीस आला.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

चौथ्या घटनेत सरोज चंद्रिका गुप्ता (वय 43, रा. भूमकर चौक, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी गुप्ता यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / ई बी 1524) वाकड येथील शिवगंगा सोसायटीच्या समोर रस्त्याच्या बाजूला 27 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.