Chinchwad : संगणक अभियंता महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक

एमपीसी न्यूज – सासरच्या त्रासाला कंटाळून संगणक अभियंता महिलेने राहत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे.

संतोष नामदेव पाटील (वय 37, रा. लिंकरोड, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. त्याच्यासह सासू सुजाता पाटील आणि सासरे नामदेव पाटील या दोघांवर गुन्हा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या वडिलांनी (वय 68) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मेघा संतोष पाटील (वय 30) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघा एका आयटी कंपनीत नोकरी करत होत्या. तर त्यांचे पती डॉक्टर आहेत. त्यांना तीन वर्षांचा एक मुलगा आहे. आरोपींनी त्यांच्याकडे फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 25 लाख रुपये आणण्याची मागणी करून किरकोळ कारणावरून वारंवार घालून पाडून बोलून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला.

सासरच्या या त्रासाला कंटाळून मेघा यांनी शनिवारी दुपारी राहत्या घराच्या पाचव्या मजल्याच्या गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या केली. याबाबत पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

दरम्यान, शनिवारी मेघा आणि सासरच्या मंडळींचे कामवाली बाई घरकामासाठी आली नसल्याच्या तत्कालीन कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. या सर्व त्रासाला कंटाळून मेघा यांनी राहत्या घराच्या पाचव्या मजल्याच्या गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या केली. याबाबत पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.