Chinchwad: घरगुती भांडणातून पतीने केले पत्नीवर चाकूने वार

एमपीसी न्यूज – घरगुती भांडणातून पतीनेच घरातील चाकुने पत्नीवर जीवघेणा( Chinchwad)वार केले आहेत. ही घटना सोमवारी (दि.25) चिंचवड येथील वाल्हेकरवाडी परिसरात घडली आहे.

याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सुमेश बुलुच राम(Chinchwad) (वय 35 रा. चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

PCMC : पिंपरी महापालिकेचे पाच जलतरण तलाव अद्यापही बंदच

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भावजयी नारोदेवी सुरेश राम (वय 32) यांच्या सोबत आरोपीचे भांडण झाले. त्या भांडणात आरोपीने घरातील चाकुने नारोदेवी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यावरून आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.